बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीाआय चौकशी व्हावी याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट अमित शहांवर निशाणा साधला आहे.

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजप करत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसत असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी?, अशी मागणी पटोलेंनी केला आहे.

दरम्यान, लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पटोलेंच्या या टीकेला भाजपकडून  काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहे!”

“इतिहासात पहिल्यांदाच राजभवनामधून भाजप कार्यालय सुरूये”

‘दगडफेक करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…’; गोपीचंद पडळकरांचा व्हिडीओ टाकत निशाणा

“कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More