बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

मुंबई | भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन पत्र दिलं होतं. या निवेदन पत्रातील महत्त्वाचे मुद्दे म्हणत भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र पाठवलं आहे. या पत्रावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे.

राज्यपाल हे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावली जात आहे हे सांगण्याचे काम भाजप करत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. येत्या 5 तारखेला विधानसभा अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवर भाष्य केलं.

दरम्यान, मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. जी जबाबदारी देतील ते पार पाडेल. माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही. महाविकास आघाडी मध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली अधिवेशन आणि बाकी विषयांवर चर्चा झाली असल्याचं पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नयेत- गोपीचंद पडळकर

…म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून वाजत गाजत गावातून अंत्ययात्रा काढली!

चिंता वाढली! मंगळवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजारांची वाढ

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More