दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल- नाना पटोले
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणचा मुद्दा राज्यांत चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारीत अध्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना टोला हाणला आहे.
जेव्हापासून केंद्रात भाजपचं सरकार आलं तेव्हापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यपालांची खुर्ची चालते. हे अनेकदा त्यांच्या कृतीतून सिद्ध होतं. महाराष्ट्रातच नाही तर इतर पक्षाचं सरकार आहे तिथे सरकार अस्थिर करण्याचं काम राज्यपालांकडून करण्याचं काम सुरू असतं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आता ज्या 6 जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या आहेत त्या ओबीसी आरक्षण अबाधित ठेवूनच झाल्या असत्या. मात्र दिल्लीतून फोन आल्यावर त्यांनी सही केली असावी, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेचं स्वागत आहे मात्र त्यांनी हा निर्णय जर दोन दिवसांपुर्वी घेतला असता तर न्यायालात भूमिका मांडणं सोप्प झालं असतं, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राहुल- अय्यरने मुंबईला धो धो धुतलं! कोलकाताचा मुंबईवर धमाकेदार विजय
”भाजपला 3 वर्षात देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”
राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांना मोठा झटका, बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय
धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार
Comments are closed.