बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

मुंबई | दिल्लीतीस चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यावर भारतीय सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे. केंद्र सरकारच्या दबावाखाली त्यांनी ट्विट केलं आहे. केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?, हा सवाल आता मोदी सरकारला जनता विचारत आहे हे चुकीचं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देशात बदल होणार आहे. राज्यात सत्ता बदल होणार नाही. ही सत्ता पाच वर्षे टिकणार असा आम्हाला विश्वास आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, ज्या भारतीय सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं त्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. मात्र या ट्विटमुळे सचिन अडचणीत आला आहे. सचिनने शेतकऱ्यांची बाजू न घेतल्याने त्याचे चाहतेही त्याच्यावर नाराज झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More