बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे- नाना पटोले

मुंबई | काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे?, असा खोचक शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजपशासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र करोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत असल्याचं नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारने आरोग्य सुविधा, औषधी, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजपा नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मुंबई पोलिसांनी तो उधळून लावला असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील भाजपचे नेते तर या संकटकाळात लोकांच्या मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत. केंद्र सरकारचा गलथानपणा आणि अपयशावर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराचे वाभाडे काढले असल्याचं म्हणत नानांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या- 

“तुला 1 मे आधी लस मिळालीच कशी”; मुलानंच घेतली अनिल कपूरची फिरकी

आता ताप कोणताही असो कोरोना चाचणी होणार; ‘या’ जिल्ह्यासाठी नवा नियम

“आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटत असल्याने भारतावर ही वेळ आली”

राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

विरारच्या आगीत पतीचा मृत्यू, बातमी समजताच कोरोनाग्रस्त पत्नीनेही सोडला प्राण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More