बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन, चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं”

मुंबई | ओबीसीच्या आरक्षणावरून राज्यातील विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. ओबीसी आरक्षण जाण्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना नाना पटोलेंनी विधानसेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्याचं मशिन आहे. खोटं बोला रेटून बोला त्यांची ती परंपरा आहे. धनगर समाजाचा प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असो. पाच वर्षे त्यांनी खोटेपणा केला. नौटंकी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला कळलेला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच आरक्षण काढलं असून त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे ओबीसी समाजाचा घात झाला आहे. त्यामुळे भाजप हे उघड्यावर पडलेलं आहे. जिथपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे जातील. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून डाटा मागवून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कायम ठेवावं, ही मागणी केलेली आहे. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे ओबीसी समाजाचं घात झाला आहे, असं म्हणत नानांनी फडणवीसांवर टीका केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं. त्यांच्याच खात्यानं 2017 साली हे पत्रक काढलं होतं. त्यांचं खातं कोण चालवत होतं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची खाती नागपूरच्या रेशीमबागेतून आलेली लोकं चालवायची. पंकजा मुंडेकडेही असाच एखादा माणूस असेल. खातं हे चालवत नव्हते. हे फक्त चेहरे होते. त्यांचं खातं चालवणारे दुसरे होते, असंही पटोलेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे; भारताचा लसीकरणात नवा उच्चांक

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

सोन्याच्या वायदे बाजारात तेजी, चांदी देखील वाढली; वाचा ताजे दर

“गलवान खोऱ्यातील शहिदांना भारत विसरणार नाही, धमक्या देखील सहन करणार नाही”

काॅमेडी क्वीन विशाखा सुभेदारला राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More