बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप बहुजन चेहरे वापरतो अन् नंतर बाजूला करतो, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा आपल्या पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर त्यावेळच्या राज्य सरकारने चौकशीसाठी झोटिंग समिती स्थापन केली होती. त्यावेळी या समितीने खडसेंना क्लीन चीट दिली होती. मात्र या चौकशीचा अहवाल गहाळ झाल्याची माहिती समजत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर टीका केली आहे.

एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते, असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.

भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे आणि बहुजन विरोधीही हा पक्ष असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महागाई विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीकोनातून बैठका सुरु असल्याचं पटोलेंनी सांगितलं.

दरम्यान, कोणीतरी मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरतात, केंद्र लस पुरवत नाही. चीन बॉर्डवर येऊन बसला आहे, अशा बातम्या पेरत असल्याचं म्हणत पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेंचा पाठिंबा, म्हणाले…

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा पंकजा मुंडेंना टोला

“कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडे असे काही करणार नाहीत”

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

‘माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा???

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More