बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीस सरकारच्या काळात आरएसएसचा वाटा किती?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यातील विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणावरून भाजपचे नेते ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. या प्रकरणात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगसिंह कोश्यारींची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसरवर आरोप करत खोचक अशी टीका केली होती. काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असून त्यांचा यामध्ये वाटा किती हे त्यांनी सांगावं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.

वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे.

जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो काँग्रेसने देशाला उभं केलं आहे, असं नाना पटोले म्हणाले. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होेते. यावेळी बोलताना नानांनी कोरोनाच्या लसीवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना वाढला असून केंद्र सरकार अजुनही अपुऱ्या पद्धतीने लस पुरवत आहे. पंरतू केंद्रातील सरकार पाकिस्तान धार्जिणी होऊन पाकिस्तानला लस पुरवतं पण महाराष्ट्राला आणि देशातील गरीबाला लस दिली जात नसल्याचं पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

अभिनेता आमीर खानलाही कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत झाला कार्यक्रम

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More