मुंबई | भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही शिडीशिवाय फासा पलटवू, असं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं हीच त्यांची खासियत आहे. राज्यात भाजप सरकार येईल कारण ते पत्रिका जास्त पाहतात असं म्हणत नानांनी फडणवासांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शहांवरही टीका केली.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?, असं म्हणत पटोलेंनी अमित शहांवर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!
‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
…म्हणून पोलिसांनी चक्क कोंबड्यांनाच पोलीस कोठडीत डांबलं!
आर. अश्विनचा नादच खुळा; अनिल कुंबळेचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला!
पुणे-सोलापूर रोडवर 3 ठार; फॉर्च्युनर गाडीचाही झाला चक्काचूर
हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा