भंडारा | सध्या पेट्रोल आणि डिझेलचे गर गगणाला भिडले असून इंधन दरांनी शंभरी गाठली आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून टीका केली होती आणि टीका करताना महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर टीका करत यांचं राज्यात जिथे चित्रीकरण चालू असेल ते बंद पाडू असा इशारा नाना पटोलेंनी दिला होता. यावरून भाजप नेते गिरीष महाजन यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. महाजनांनी केलेल्या या टीकेवर आपली प्रतिक्रिया देताना नानांनी महाजन यांना सणसणीत टोला हाणला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. याआधी महाजनांनी राज्यात मोगलाई चालू आहे का?, असा सवाल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले भंडाऱ्यात बोलत होते.
भारतमातेच्या नावावर भाजप पक्ष मोठा झाला. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली असल्याचं नाना पटोले म्हणाले. भाजप नेते राज्यातील सरकारविरोधात इंधन दरवाढीविरोधात टीका करत आहेत.
दरम्यान, मी माझी भूमिका बदलेली नसून ज्या ठिकाणी राज्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचं चित्रीकरण चालू असेल तिथे काँग्रेस काळे झेंडे दाखवणार असल्याचंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीक
ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!
शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन
आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा
तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल