बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे थांबवावं”

पुणे | कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं थांबवायला हवं, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे येथील जहांगीर रुग्णालयाला भेट दिली.  डॉक्टरांशी चर्चा करून खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांसंबंधी माहिती घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोरोना प्रतिबंधक लसी, ऑक्सिजन, रेमडिसिविर, व्हेंटिलेटर असे सर्व उपचार साहित्य केंद्र सरकारकडे आहे. मात्र याचा सुरळीत पुरवठा राज्यांना होत नाही.केंद्र सरकारने राज्यांवर अन्याय केला आहे. कोरोना काळातील रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवर मदत सुरू झाली आहे. अनेक देश राज्याला मदतीसाठी पुढे आले आहेत. मात्र आता कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात यावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

राज्याला रोज 50 हजार इंजेक्शनची गरज मात्र केंद्राकडून फक्त…- उद्धव ठाकरे

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More