बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितीन गडकरींना शिवसेनेवर आरोप करायला दाढीवाल्याने सांगितलेत का?”

नागपूर | वाशिम जिल्ह्यात शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच याचाच धागा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर निशाणा साधला आहे.

ज्यावेळी भाजप-शिवसेना युती होती त्यावेळी गडकरींना कधी शिवसेनेवर टीका करावीशी वाटली नाही का?, मात्र आज ते पत्र लिहून आरोप करत आहेत. त्यांना दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले नाहीत ना?, असा खोचक सवाल नाना पटोलेंनी केला. नाना पटोलेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग झालेच पाहिजेत आणि त्यांची कामंही झाली पाहिजेत. जी लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात त्या लोकांचं समर्थन काँग्रेस करत नाही, रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेससुद्धा आहे. मात्र 25 वर्षे एकत्र असूनही गडकरींना शिवसेनेचं काम कशी करते हे माहित नाही का?, असाही सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते असचं करत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची कामं मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा नितीन गडकरींनी पत्रातून दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कर नाही त्याला डर कशाला’; भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर सुनिल शेळकेंचं प्रत्युत्तर!

‘चिक्कीचा ब्रँड माझ्या नावाने वाढत असेल तर…’; चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना’; राज ठाकरेंनी केली आशा भोसलेंची प्रशंसा

मोठी बातमी! रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर रद्द, उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

पावसाची बातमी! पुण्यासह सातारा जिल्हात पावसाचं पुनरागमन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More