बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

मुंबई | काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा आणि त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असं आवाहन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी बोलताना नानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही 4.5 कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, अशा तिखट शब्दात नानांनी केंद्र सरकार आणि मोदींवर टीका केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का”?, असा संतप्त सवाल केला. अनेक गावं स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 5 लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे, वैद्यकीय सहायता पुरवणे याबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करून मदतीचे कार्य सुरु ठेवलं असल्याचं पटोलेंनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

लेक असावी तर अशी!, भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीकडून वडिलांना यकृत दान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More