मुंबई | राज्यसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना आंदोलनजीवी अशी उपमा दिली होती. यावरून मोदींवर विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे “ढोंगीजीवी”, असं म्हणत नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केली आहे. राज्यसभेत बोलताना मोदींनी आंदोलकांना ‘आंदोलनजीवी’, म्हटल्याने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
आंदोलकांना फक्त एवढंच काम उरलंय, अस म्हटलं होतं. समाजात आता आंदोलनजीवी नावाची नवीन जमात उदयास आल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रस नेते शशी थरूर यांनाही टीका केली आहे.
बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का?, असा सवाल करत शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली होती. तर संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत गर्व से कहो हम आंदोलनजीवी है, जय जवान- जय किसान, असं म्हटलं होतं.
नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला.
त्याचा समाचार घेत सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे “ढोंगीजीवी”…. pic.twitter.com/kfXpVQiURv
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 14, 2021
थोडक्यात बातम्या-
“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या
‘तिच्या वेदना पाहून मी…’; नवऱ्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली किडणी
‘…तिथे तिथे मी नडणार आणि भिडणारच’; चित्रा वाघ आक्रमक
“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”
“माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये”