बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल”

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी वक्तव्य करत आहेत. अशातच नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारचा रिमोट नक्की कोणाच्या हातात आहे?, यावर भाष्य केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. राज्यात सरकार स्थापन करताना शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार यांना भेटेन परंतु ती वेळ अद्याप आली नाही, असं नाना पटोले म्हणाले. यावेळी नानांनी स्वबळाचा नारा का देत आहोत यावरही आपलं प्रतिक्रिया दिली.

पक्षश्रेष्ठींनी मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार. मी काही शिवसेना वा राष्ट्रवादीवर टीका करत नाही तर भाजपवर करत असल्याचं  नाना पटोलेंनी सांगितलं. नानांच्या या वक्तव्याचा धागा पकडत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट शरद पवारांवर निशणा साधला आहे.

दरम्यान, नाना पटोले म्हणतात महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचेच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत?, असे नानांना सुचवायचे आहे का?, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?’; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पवारांवर निशाणा

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार? केंद्रात हालचालींना वेग

“मतदान घ्या पाहू तुमची ताकद, बहुमत आहे तर मग घाबरता कशाला?”

कोरोनाकाळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी विकली किडनी अन्….

कोरोना झाल्यानं तरुणानं वाढदिवसादिवशीच उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More