बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

मुंबई | देशाच्या राजकरणात मोठी उलाढाल होत असलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यानंतर शरद पवार मंगळवारी 15 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असल्याचं समजत आहे.  त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना विचारलं. यावर बोलताना शरद पवारांचा पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगवेगळे वारे वाहू लागतात त्या वेळी शरद पवार अशा भूमिका घेतात, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. त्यामुळे याला काही नवीन म्हणणं हे चुकीचं असल्याचंही पटोले म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आणि प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केलं.

दरम्यान, कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्यानं मारतील, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. यावर,  स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?, असं नाना म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

​​द ग्रेट खली यांच्या आई तांदी देवी यांचं निधन,

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

देशातील नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा घटला, वाचा आजची आकडेवारी

“केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढवणार”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More