बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप कृतघ्न, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रं लिहिलं आहे. सरनाईक यांनी ठाकरेंना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली होती. पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला आता भाजप त्रास देत आहे. भाजपचं हे कृतघ्नपन असून बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही. त्यामुळे ते खुर्ची ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांचं सरकार भक्कम आहे. राज्यातील जनताही सरकारच्या कामगिरीवर खूष आहे. मात्र सत्ता नसल्यामुळे भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

दरम्यान, दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली असल्याचं नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More