बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत नाना पटोलेंचा मोठा खुलासा, म्हणतात…

मुंबई । काँग्रेस पक्षाला 2019 पासून राष्ट्रीय अध्यक्ष नाहीय. सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नाना पटोले यांचं देखील नाव असल्याची चर्चा होती. मात्र नाना पटोलेंनी स्वत: या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावं अशी ईच्छा देखील पटोलेंनी व्यक्त केली. दरम्यान भाजप सरकारने महागाईची सीमा पार केली आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवरही निशाणा साधलाय.

नाना पटोलेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे अफवांना पूर्णविराम तर मिळाला. पण राजकीय गोटात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More