मुंबई| विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणाकडून (Central Investigation Agency) महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचा खुलासा नाना पटोलंनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करत आहेत आणि त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असं नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याशिवाय, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून दबाव देखील टाकला जात आहे. विधान परिषद निवडणुकीकरीता विरोधकांना 22 मतं पाहिजेत. पण एवढी मतं त्यांना मिळणार नाही. आणि म्हणून केंद्रीय तपस यंत्रणेचा दुरुपयोग करून, पैश्यांचा वापर करून आता भाजपला फायदा होणार नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
दरम्यान, केंद्रीय तपास आमदारांना फोन करत आहेत व त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. मात्र, ते आम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी उघडकीस आणू, असा दावा नाना पटोलेंनी केला. तर भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत 6 जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. आम्ही सर्व आमदारांच्या संपर्कात आहोत, असा विश्वासही नाना पटोलेंनी दाखवला आहे.
थोडक्यात बातम्या-
अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार, म्हणाले…
अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘हा तर अपमान आहे’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
हॉटेल मालकाने अडवल्यानंतर सदाभाऊ खोत संतापले; राष्ट्रवादीला दिला गंभीर इशारा
Comments are closed.