बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी

मुंबई | संपूर्ण देशभरात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस देण्याची मोहीम सुरु झाली आहे. या लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचं दिसून येतंय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोना लसीसंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. कोरोना रुग्णांच्या वयोगटाचा विचार केला असता 20 ते 40 या वयोगटातील तरुण मंडळींमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 18 वर्षांवरील सर्व तरुणांना सरसकट कोरोनाची लस देण्याची मागणी केली आहे.

तरुणवर्गामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने लस देण्याच्या अटींमध्ये शिथिलता आणण्याची गरज असल्याचं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडुन या संदर्भात परवानगी घ्यावी जेणेकरून मोठ्या प्रमाणात लसीकरण जनतेपर्यंत पोहोचवता येईल, तसेच कोरोनाला आळा बसवण्यास मदत होईल, असंही पटोले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.  आजच्या संवादात मुख्यमंत्री नवीन नियमावली जाहीर करून महाराष्ट्रात आणखी कोणते कडक निर्बंध लावतील याकडे जनतेचं लक्ष लागून आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ

कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित

भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ

महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील सात दिवस ‘या’ सेवा राहणार बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More