बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई | साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महिलांच्या सुरक्षेविषयी पत्र लिहून दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले होते. त्यावर राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फक्त पुरूष सुरक्षारक्षकच असतात. तिथे महिला सुरक्षा रक्षक नेमावे, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात नाना पटोले यांनी साकीनाका बलात्काराचा उल्लेख देखील केला आहे. साकीनाका येथील अत्याचाराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेची अधिक काळजी घ्यायला हवी, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

या पत्रात नाना पटोलेंनी देशभरात महिलांच्या सुरक्षेविषयी महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेचा उल्लेख केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्राचा नावलौकिक कमी होणार नाही यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत ,अशी मागणी नाना पटोले यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राने जर महिलांच्या सुरक्षेविषयी निर्णय घेतला तर इतर राज्यांना तो मार्गदर्शक ठरेल. तसेच आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यालं, अशी अपेक्षा देखील नानांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

”आपलं कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसं नाही”

जगप्रसिद्ध असलेल्या IPLला ‘या’ देशात प्रसारणावर बंदी, कारण वाचून व्हाल हैराण!

“राज्यात इतक्या घटना घडतात तरीही सरकार षंढासारखं बसलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More