बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

मुंबई | राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी चालू आहे तर दिल्लीत महाराष्ट्र काॅंग्रेसबाबत पक्षात खलबत चालू आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्यात आणि पक्षश्रेष्ठींमध्ये सध्या खलबत सुरू आहे. या चर्चेनंतर नाना पटोले यांनी पत्रकारांना विविध मुद्द्यांवर उत्तर दिली आहेत.

दिल्लीत तिन्ही नेत्यांनी हायकमांडसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभवाबाबत चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील पक्षबांधणी आणि संघटनात्मकाबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाबाबत अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची निवड केली जाते त्यावरही चर्चा झाली आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली आहे. “मला वाटतं अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होईल”, असं नाना पटोले म्हणाले. ‘अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी काँग्रेसमधून कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पटोले म्हणाले की, हा निर्णय हायकमांडचा आहे. परिणामी आता कोणाता मंत्री राजीनामा देणार याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे. विरोधकांनी अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीनं घेण्याची मागणी लावून धरली आहे. परिणामी आता 22 तारखेपासूनच्या या अधिवेशनात चांगलाच राडा होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

चंद्रकांत पाटलांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज, म्हणाले ‘जनतेच्या मैदानातही…’

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More