बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा, मात्र बाळासाहेब थोरातांचा वेगळाच सूर

अहमदनगर | गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यातच आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळे सुर लावल्याचं दिसत आहे.

काँग्रेसमध्ये अध्यक्ष सांगतात, त्यानुसार धोरण ठरते. पक्षाच्या अध्यक्षांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी करायला सांगितले आहे. त्यादृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत आहोत. अंतिम निर्णय त्यानंतरच होऊ शकेल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत असून यापुढेही अशीच आघाडी असावी, अशी आता जनतेची अपेक्षा आहे, असंही थोरात म्हणाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका या टप्यात होत आहेत. आमच्याकडे अध्यक्ष हा अध्यक्ष असतो. जनमताच्या चाचण्या पाहिल्या तर जनमताचा कौल आघाडी सरकारच्या बाजूने आहे. पुढच्या काळातही असेच काम करावे, ही जनतेची अपेक्षा आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. मात्र, नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्षांना पत्र पाठवून स्वबळाची तयारी करण्याचं सांगितलं आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्याही प्रदेशपातळीवरून मान्यता घेतल्याशिवाय करू नयेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच काँग्रेसमधील काही नेते आघाडी करण्याचे संकेत देत आहेत. राज्यात पुढील महिन्यात स्थानिक निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग येईल. या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडी करणार हे पाहण महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

“तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचं सरकार येणारच”

नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत; यंत्रणांना दिले सज्ज राहण्याचे आदेश!

“नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, पाच वर्ष होतील पण…”

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More