बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोले यांच्या वक्तव्यांवरून महाविकास आघाडीमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे दिसून येते”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी  महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलं, त्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असून या सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात दरेकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्टिट केलं आहे.

एकीकडे एकत्र असल्याचा कांगावा करत आहेत.तर दुसरीकडे तेच एकमेकांवर आरोप करत असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपआपसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत.

तसेच नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यातून बरंच काही राज्यातील जनतेला समजून येत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मतभेदांचा नाही, तर प्रश्न महाविकास आघडीच जर एकत्रित नसेल, तर राज्यातील जनतेला काय न्याय देणार?, हे राज्यातील जनतेला दिसून येत असल्याचं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.


थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

“तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण…”

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

“दैनिक सामनाचा संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More