बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोले म्हणतात, “मी बोलतो तेच करतो, दादापेक्षा नाना मोठा…”

अकोला | राज्यात मागील काही महिन्यांपासून राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या त्यांच्या वक्तव्यांवरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आपल्याला मी सांगू इच्छितो की, माझं नाव नाना पटोले आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. मी जे बोलतो तेच करतो. दादापेक्षा नाना मोठा असतो, अशी कोपरखळी नाना पटोले यांनी मारली आहे. पटोले हे अकोला जिल्ह्यातील कुटासा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलत होते.

पटोले भाषणास उठताच तरूणांनी जल्लोष केला. ही निवडणूक आपण नक्कीच जिंकणार आहोत, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढं बोलताना म्हणाले की, मोदींनी काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. देशातील प्रमुख उद्योजक अदानी यांची कित्येक पटींनी संपत्ती वाढली आहे. अमित शहांच्या मुलाची संपत्ती वाढली आहे, पण देशातील तरूणांना अजून रोजगार नाही.

दरम्यान, या निवडणुकीत भाजप जनतेचा लुटलेला पैसा वाटत आहे. जर देशातील सरकार बदलायचे असेल तर, आतापासूनच प्रत्येक निवडणुकीत तुम्ही बदल घडवायला पाहिजे, असं आवाहन पटोलेंनी जनतेला केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार’; जयंत पाटलांनी सांगितला मेगा प्लॅन

बाबो! ‘वर्ल्ड आयकाॅन’ एलोन मस्कने एका दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ हजार कोटी

“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा नाहीतर, 2 ऑक्टोबरला जलसमाधी घेणार”

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More