नागपूर | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याजागी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यत येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद मी मागितलेलं नव्हतं. हायकमांडने मला ही जबाबदारी दिली होती. जर त्यांनी जबाबदारी दिली त्याला प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेणे ही माझी जबाबदारी आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मी कोणतेही पद मागितलेलं नाही. मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही. त्याबद्दल चर्चा करण्यात काहीही अर्थ नसल्याचं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेच्या अध्यक्षाची नोंद मीडियाने घेतलेली आहे. ते माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण याचा वापर जनतेच्या हितासाठी केला असल्याचं पटोले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
औरंगाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या- प्रकाश आंबेडकर
“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”
“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”
कोरोनावर मात करत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजींनी दिला ‘हा’ कानमंत्र
ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचे रूग्ण आढळले महाराष्ट्रात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती