नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे

नांदेड | नांदेड महापालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदासाठी विनय गरडे यांची निवड झालीय. 

काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना 74 मतं मिळाली. अपक्ष उमेदवारानेही काँग्रेस उमेदवारांना मतदान केलं. 

भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 68 मतांनी पराभव झाला. शिवसेनेच्या एकमेव नगरसेवकाने कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेणं पसंत केलं.