बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

नांदेड | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू आता महाराष्ट्रातील विविध भागांमधून दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये 24 तासात फक्त 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नांदेडमध्ये आतापर्यंत 90 हजार 885 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 87 हजार 918 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 897 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 529 कोरोनाबाधितांवर नांदेड जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासात नांदेडमध्ये 2 हजार 777 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी फक्त 15 जण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला पाहायला मिळत आहे. अशी सकारात्मक बातमी महाराष्ट्रातील सर्व भागातून दिवसेंदिवस येत राहिली तर लवकरच महाराष्ट्रमुक्त होईल यात शंका नाही.

थोडक्यात बातम्या –

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

वारकऱ्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे- तुषार भोसले

‘नागिन’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं सोडला अभिनय; केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More