शेतकऱ्याचं मरण स्वस्त झालंय; स्वतःच्या हातानं चिता रचून संपवलं आयुष्य

नांदेड | कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वतःचा दुर्दैवी शेवट केल्याचा प्रकार समोर आलाय. नांदेडच्या उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

पोत्तना बोलपीलवाड या शेतकऱ्याचं नाव आहे. स्वतःच्या हातानं सरण रचून त्यांनी पेटत्या चितेत उडी घेतली. 

पोत्तना यांच्या डोक्यावर कर्ज होतं. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नव्हतं. 

दरम्यान, उसनवारी करुन त्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं ओढ दिल्यानं आलेल्या नापिकीचं संकट त्यांना पेलवलं नाही आणि त्यांनी आयुष्य संपवलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या