खंडवा | देशात लसीकरण सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशमधील खंडवाचे भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
नंदकुमार सिंह चौहान यांनी सहावेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले होते. तर दोन वेळा त्यांनी आमदारकीही भुषवली आहे. तसंच चौहान सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिले होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा भुषवलं होतं.
दरम्यान, देशात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल एम्स रूग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. तसेच त्यांच्यापठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील कोरोना लस घेतली आहे.
थोडक्यात बातम्या-
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”
‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!
Comments are closed.