औरंगाबाद महाराष्ट्र

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर ‘वंचित’ आघाडीमधून बाहेर

औरंगाबाद | रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी वंचित आघाडीपासून वेगळे होतं असल्याचं स्पष्ट केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 26 व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

आम्ही वंचितला त्यावेळी पाठिंबा दिला होता मात्र वंचितला यश आलं नाही. त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये नैराश्य निर्माण झालं आहे. आता गटातटाना एकत्र कऱणं शक्य नाही मात्र जमेल तेवढ्यांना आमच्या सेनेत आणून आम्ही ऐक्य करू आणि येणाऱ्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आम्ही आमच्या बळावर उमेदवार उभे करू, असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

Loading...

आंबेडकरी चळवळ पायावर उभी रहावी म्हणून आम्ही वंचितला पाठिंबा दिला होता, आता फक्त रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी काम करून सत्तेपर्यंत पोहोचू, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही. आता आनंदराज आंबेडकरांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे वंचित आघाडीला आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

Loading...

ठळक बातम्या-

…तर तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला; रोहित पवारांचा भाजपला सल्ला

“किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील”

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...

ताज्या बातम्या