महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी

Nandurbar l गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकालआज जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय निश्चित झाला आहे.

महाविकास आघाडीचा पहिला विजय :

नंदुरबारमधून गोवाल पाडवी हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नंदुरबार लोकसभा निवडणुकीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी विजयाचा पताका रोवला आहे तर त्यांनी महायुतीच्या हिना गावित यांचा पराभव केला आहे.

हिना गावित यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा देखील घेतली होती. तर महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.अशातच आता तेथून भाजपचा पहिला पराभव झाल्याचे समोर आले आहे.

Nandurbar l हिना गावित यांचा दारुण पराभव :

नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीने विजयच खात उघडलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघीचे नेते गोवाल पाडवी हे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने काबीज करणार केले आहे.

News Title- Nandurbar Goval Padvi Win

महत्वाच्या बातम्या-

दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान

वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं

सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव

राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा

मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर