बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल; गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि नाराज एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये तोडगा निघताना दिसत नाही. अशात संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. परिणामी आता राज्य सरकारनं हल्ला करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडं या प्रकरणाचा तपास सोपण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. आंदोलन आणि हल्ला करणाऱ्या एकूण 107 जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात 23 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी एसटी आंदोलकांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये.

सरकार आणि मुंबई पोलिसांना कसलाही पत्ता न लागू देता मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अन्य काही जणांनी हल्ला केल्यानं राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दंगल निर्माण करणे, हिंसाचार करणे, षडयंत्र रचणे अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यानंतर विविध पक्षातील नेते प्रतिक्रिया देत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”

“नरेंद्र मोदींनी ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘गुजरात फाईल्स’ची प्रसिद्धी करावी”

ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…

ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More