नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!

Narak Chaturdashi 2024

Narak Chaturdashi 2024 | देशभरात सध्या दिवाळी या सणाची धामधूम सुरू आहे. हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. 5 दिवस घरोघरी दिवाळी साजरी केली जाते. उद्या 31 ऑक्टोबररोजी नरक चतुर्दशीचा दिवस असेल. या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. (Narak Chaturdashi 2024 )

प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. यालाच छोटी दिवाळी असंही म्हणतात. या दिवशी घरात सुख-शांतीसाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत या लेखात सविस्तर सांगितले आहे. ते आपण जाणून घेऊयात.

नरक चतुर्दशीला काय करावे?

सर्वप्रथम पहाटे लवकर उठावे.
या दिवशी पहाटे लवकर उठून उटण्याने स्नान करणं शुभ मानलं जातं
14 दिव्यांची आरास लावावी
या शुभ दिनी भगवान विष्णूसह, कृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी
या दिवशी देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित कराव्या आणि त्यांची पूजा करावी. (Narak Chaturdashi 2024 )

नरक चतुर्दशीला काय करू नये?

या दिवशी मांसाहारी पदार्थ तसेच तामसिक पदार्थांचं भोजन करू नये
या दिवशी केस आणि नखं कापू नये
या दिवशी फार उशिरापर्यंत झोपू नये (Narak Chaturdashi 2024 )
या शुभ दिनी कोणत्याही मुक्या प्राण्याची हत्या करु नये
नरक चतुर्दशीच्या दिवशी मीठ, तेल आणि खोट्या वस्तूंचं दान करणं अशुभ मानले जाते.

News Title –  Narak Chaturdashi 2024

महत्त्वाच्या बातम्या-

लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार! पाहा सुट्ट्यांची यादी

“बारामतीकर सुज्ञ आहेत, ते मलाच निवडून देतील”; अजितदादांना ठाम विश्वास

शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…

राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .