नरेंद्र मोदीच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत; ‘इन्फोसिस’च्या नारायण मूर्तींची इच्छा

मुंबई | इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.  मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोदी पंतप्रधान बनणं फायद्याचं ठरेल. तसेच भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सुद्धा ते कठोर मेहनत घेत आहेत, असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं आहे. 

जीएसटी लागू करण्यामध्ये काही उणीवा राहिल्या असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी मोदींना जबाबदार धरता येणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत राफेल प्रकरणी बोलणं उचित ठरणार नाही, असं म्हणत त्यांनी राफेलवर भाष्य करणं टाळलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर रणवीर-दीपिकाचं ‘शुभमंगल सावधान’; पाहा दोघांच्या लग्नाचे फोटो

-आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले

-राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

-संघाच्या लाठीवर बंदी घालावी; न्यायालयाने बजावली नोटीस