बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांच्यावर छापेमारी झाली ते काय संन्यासी होते का?, कारवाई झाली ती योग्यच”

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सध्या चांगलंच राजकारण पेटलं आहे. ईडी (ED), सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) या यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली आहे. यावरूनच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Central Minister Narayan Rane) यांनी सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीच्या कारवाईनं सुप्रिया सुळे यांनी केंद्राला संसदेत चांगलंच सुनावल होतं. त्यावर आता नारायण राणे यांनी महाविकासा आघाडीवर टीका केली आहे. ज्यांच्यावर छापेमारी झाली ते काय संन्यासी होते का?, कारवाई झाली ती योग्यचं होती, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर कारवाई झाली होती. यावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. अशातच राणे यांनी त्या कारवाईवर देखील भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर झालेली कारवाई योग्य होती, असं राणे यांनी सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान, संसदेत महाविकास आघाडीच्या खासदारांनी राज्यामध्ये होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून चांगलंच रान उठवलं होतं. शिवसेना खासदार विनायक राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्रीय गृहखात्याला जबाबदार धरलं होतं.

थोडक्यात बातम्या 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

“दलालांनो… मंगळसूत्र, शेती गहाण ठेवून दिलेले पैसे घेऊन तुमची मुलं सुखी होणार नाही”

Omicron | ‘….तर पुन्हा कडक निर्बंध लागू करू’; ‘या’ दहा राज्यांना केंद्राचा इशारा

“आघाडी केली म्हणजे आघाडीत आलंच पाहिजे असं काही नाही, कुणालाही कसलं बंधन नाही”

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More