बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणेंसह चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला आहे. मी नारायण तातू राणे.., असं म्हणत नारायण राणेंनी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली. यावर नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसला टोला हाणला आहे.

मी याचं श्रेय भाजपच्या नेतृत्वाला देईल, जे काँग्रेसला बारा वर्षे समजलं नाही. ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं की, राणेंची किंमत काय आहे. त्यांचं वजन काय आहे. त्यांचा अभ्यास आणि अनुभव काय आहे. काँग्रेसनं वारंवार राणेंना शब्द देऊनही तो पूर्ण केला नाही. पण अवघ्या दीड वर्षात भाजपनं मला आमदार केल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

माझ्या मोठ्या बंधुंना प्रदेश भाजपचं काम करण्याची संधी दिली. राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली. कार्यकर्त्याची जाण असणारा म्हणून भाजपची जी ओळख आहे. त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. याचा फायदा भाजपसाठी कसा करता येईल याचा आम्ही प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान,राष्ट्रपती भवन मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आतील शपथविधी पार पडत आहे या दरम्यान आतापर्यंत नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू यांचा शपथविधी पार पडला आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यातील भाजप नेत्यांची वर्णी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी केले मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनाम्याच्या चर्चेवर रावसाहेब दानवे म्हणाले…

“मंत्र्यांच्या राजीनाम्यामागे परफॉर्मन्स हाच निकष असेल, तर पंतप्रधान मोदींनाही हटवा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More