मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून आता शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंच्या मंत्रिपदावरून विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने मिळालेले मंत्रीपद हे त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वापरावे. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी अन्यथा हे मंत्रीपद स्वाहा करून टाकतील, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पुर्ण झालेली आहेत. आणखी अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिल, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांना दिर्घायुष्य लाभो. मात्र, नारायण राणे आणि पितापुत्रांचा राजकीय इन्शुरन्स संपला आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, विनायक राऊत यांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब फुसका आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनं, असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतील माझ्या त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत. बुरा ना मानो होली है, पण एक दिवस तरी चांगलं बोला, असा सल्ला मी भाजपवाल्यांना देईल, असा टोला विनायक राऊतांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश!
युद्धादरम्यान भारताने रशियासोबत केला ‘हा’ मोठा व्यवहार
शरद पवारांकडून भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
Comments are closed.