Narayan Rane | कोकणात बॅनरबाजी सुरू आहे. एका बाजूला शिंदे गटाने बॅनरबाजी केली आहे. त्यानंतर आता कणकवलीत भाजपचे नेते नारायण राणेंची (Narayan Rane) बॅनरबाजी करण्यात आली. शिंदे गटाच्या बॅनरवर लिहिलं आहे की, ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’, अशा आशयाची बॅनरबाजी केली होती. त्या बॅनरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्या बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा फोटो होता.
नारायण राणेंची बॅनरबाजी
उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या बॅनरबाजीवरून एकच चर्चा झाली. त्यावर आता प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंची (Narayan Rane) बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर आता ‘बाप बाप होता है… झुंडमे कुत्ते आते है शेर अकेला आता आहे…’,अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली.
शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलने उत्तर देण्याचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आला आहे. कणकवली शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनरवॉर कणकवलीच्या नाक्यावर आले. पटवर्धन चौकात बॅनर लावले आहे. रत्नागिरीतही रात्री या आशयाचे बॅनर लागले होते.
उदय सामंत आणि किरण सामंत यांचे बॅनर
कणकवलित लागलेले बॅनर हे नारायण राणेंना डिवचण्यासाठी होतं. त्यात ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे मजकूर या बॅनरवर लिहण्यात आले आहे. त्याला उत्तर रविवारी देण्यात आलं. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र आता ही जागा भाजपने मिळवली. यामुळे नारायण राणेंना (Narayan Rane) भाजपने तिकिट दिलं.
लोकसभेमध्ये मतभेद विसरून नारायण राणे आणि उदय सामंत यांनी काम केलं. त्यामुळे नारायण राणे विजयी झाले. मात्र आता बॅनरवॉरमुळे कोकणातील वातावरण राजकीय तापलं आहे. दोन्हींचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाहीये. उदय सामंत यांनी हा विरोधकांचं कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत उमेदवार होते. यामध्ये नारायण राणेंनी (Narayan Rane) विजय मिळवला आहे.
News Title – Narayan Rane And Uday Samant Banner At Kankavali News Update
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो खरीप हंगामासाठी आल्या ‘या’ योजना; अर्ज कसा करणार?
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-बेंगळूर विमानसेवेला मिळाला हिरवा कंदील
सावधान! ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा इशारा
ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती