मुंबई | एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा?, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, बाळासाहेबांनी मला पदं दिली, बेडूक म्हणून नाही, तर वाघ म्हणून, असं नारायाण राणे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”
मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी
देवेंद्र फडणवीसांबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही- रोहित पवार
Comments are closed.