बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

मुंबई | केंद्रीय सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे राज्यात जनआर्शीवादचं नेतृत्व दिलं होतं. त्यानंतर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जो राजकीय वाद सुरू झाला. तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे.  त्यामुळे त्या कार्यक्रमात काय घडणार आहे. याची प्रतिक्षा राज्यातील सगळेच जण पाहत आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं येत्या 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार, खासदार हे देखील उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. नारायण राणे आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

विमानतळाच्या उद्घाटनसाठी मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांना बोलावायचं की नाही याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले?, असा प्रश्न करत विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. तर राणेंच्या वक्तव्याशी भाजप नेते असहमती दर्शवत आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शिवसेना-नारायण राणे हा वाद राज्यात चांगलाच गाजला होता. पुन्हा एकदा नारायण राणे आणि ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने पुढं काय घडणार आहे, हे आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

गर्भवती असूनही रुग्णांची केली सेवा; नुकतीच आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं घेतला जीव

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत वाढ; सोमय्यांना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More