मुंबई | खासदारकीचा मार्ग मोकळा होताच नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. मी खासदार झालो तरी शिवसेना अद्याप सत्तेत आहे, असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.
जे बोलतात तसं वागत नाहीत त्यांना शिवसेना म्हणतात. हिंमत असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असं आव्हानही नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीतून भाजपच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे आता नारायण राणेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Comments are closed.