मुंबई | नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ नावाच्या आत्मचरित्राचं प्रकाशन नुकतंच मुंबईत पार पडलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी TV9 मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
राष्ट्रवादीत जाणार का?? या प्रश्नावर कधी काय होईल सांगता येत नाही. मला राष्ट्रवादीची आणि काँग्रेसचीसुद्धा ऑफर आहे. मात्र ऑफिसियली भाजपमध्ये प्रवेश करायचा की दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचं हे मी येत्या 8 दिवसांत ठरवणार आहे, असं नारायण राणे म्हणाले. मात्र राणेंनी दिलेल्या उत्तराने राष्ट्रवादीला आणि पवारांना वेटिंगवर रहावं लागणार आहे.
‘झंझावात’ पुस्तक प्रकाशनाला शरद पवार, नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार, गडकरी, राणेंची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. राणेंना भाजपमध्ये घ्यायला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला फडणवीसांनी मुद्दाम दांडी मारल्याच्या चर्चा आहेत.
पवार साहेबांकडे बघून तरी पक्ष सोडू नका, असं आवाहन राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांना नारायण राणेंनी केलं. कधी काय होईल सांगता येत नाही… राणेंचे हेच 4 शब्द खूप काही सांगून जातात.
महत्वाच्या बातम्या-
-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!
-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट
-“आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू”
-ईडीच्या नोटीसनंतर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…
-10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा- प्रकाश आंबेडकर