बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

मुंबई | अतिवृष्टीमुळे राज्यातील कोकण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये काही गावांवर दरड कोसळली आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

राज्यात संकट येत आहेत त्याला मुख्यमंत्र्यांचा पायगुण कारणीभूत आहे. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय, कोरोना काय सर्व चालू आहे. कोरोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोक चार दिवसांपासून जाब विचारत होते. मात्र आधी काही कल्पना दिली नाही, लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरित करायला हवं होतं या सर्वांना हे सरकार जबाबदार असल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला असून आता फिरत आहेत, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

देशातील ‘या’ खासगीकरणाच्या मुद्यावरून डाॅ. अमोल कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते फिरत आहेत- नारायण राणे

“दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल; लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही”

…म्हणून मिराबाई चानूला मिळणार लाईफटाइम पिझ्झा फ्री!

हर्षवर्धन पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणी केला?, भरणेमामांनी डिटेल सांगितलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More