बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सावंतवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. तर या मेळाव्यादरम्यान राणेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपापसात मतभेद नको म्हणत पदासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्यांचे नारायण राणेंनी कान टोचले. तर यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान, पुजा चव्हाण यांच्या मृत्यूवरून नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान यांच्या खुनाचे पुरावे दिले. मात्र कोणावरही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून अटक झाली नाही, असा घणाघाती आरोप नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूबद्दल बोलतानाच नारायण राणेंनी पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरूनही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी पराक्रम केला, असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे. तर किती मर्डर पचवणार हे सरकार? असा सवाल उपस्थित करत, नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

दरम्यान, नारायण राणेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि एसटीच्या खासगीकरणावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सत्तेत आल्यापासून हे बंद ते बंद असं सुरू आहे. आजारी असल्यामुळे ते जास्त बोलत नाहीत. राज्य कसं चालवावं याचा मुख्यमंत्र्यांना अभ्यास नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.

थोडक्यात बातम्या-

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

दिलासादायक! महाराष्ट्रातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या आत

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More