“उद्धव ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते”
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीत सभा घेत भाजपवर टीकेची झो़ड उठवली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी एवढी मोठी सभा घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून केलेल्या टीकेला आता भाजप (BJP) नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या ते सांगावं. तुम्ही चुली पेटवण्याचं नाही तर चुली उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणेंनी केला आहे.
मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. यांना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली आहे. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले पण त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवण्याचं काम केलं. हा इतिहास असताना परवाचं भाषण ऐकून वाईट वाटलं, असा टोला देखील राणेंनी लगावला.
दरम्यान, शिवसेनेवर (Shivsena) बोलणाऱ्यांना आम्ही अंगावर घेतलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात. त्यामुळे आता भाजपच्या अंगावर येऊ नकात, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
केतकी चितळे प्रकरणात तृप्ती देसाईंचा थेट राष्ट्रवादीवर हल्लाबोल, म्हणाल्या…
राष्ट्रवादीच्या आंदोलनावर स्मृती ईराणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
‘केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून…’; राष्ट्रवादीची बोचरी टीका
‘हिंमत असेल तर…’; भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंचा मोठा निर्णय, आता लवकरच…
Comments are closed.