Top News

पैसे कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे- नारायण राणे

सिंधुदुर्ग | पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. तसेच शिवसेना दुटप्पी असल्याचा टोलाही राणेंनी लगावलाय.

राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचं राणे म्हणालेत.

दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सॅल्यूट…दुर्घटना होऊ नये म्हणून भर पावसात मॅनहोलजवळ तब्बल 5 तास उभी राहिली महिला, पाहा व्हिडीओ

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

इंदुरीकर प्रकरणात न्यायालयाने निभावली महत्त्वाची भूमिका…

कहाँ गये वो 20 लाख करोड?, पाच दिवसीय आंदोलनातून युवक काँग्रेस मागणार हिशोब

जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचं कोरोनाने निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या