महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”

मुंबई | ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चालला आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही, अनुभवला नाही, अशी बोचरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होेते.

मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असं उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत सांगितलं. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय, असा टोला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मोदी साहेबांना आणि अमित शाहांना धमक्या देऊ नका, आम्ही येथे समर्थ आहोत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केलीये.

मुख्यमंत्री आता शिवसैनिकांना भेटणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे एक वर्ष आमदार आणि मंत्र्यांनाच भेटले नाहीत. जनतेला तर त्यांचे दर्शनही झाले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केलीये.

महत्वाच्या  बातम्या- 

“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”

राष्ट्रवादीकडून ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!

पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव; धवन-पंड्याची खेळी व्यर्थ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या