बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

सिंधुदुर्ग | महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून आर्थिक विवंचनेत सापडलेला एसटी कर्मचारी हा सध्या हवालदिल झाला आहे. असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्यातच राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेेंनी यांनीही काल सिंधुदुर्गात बोलत असाताना एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींच्या मुद्यावरून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, त्यांना कित्येक महिने पगार नाही, खरं तर याने एवढं कमावलंय, की याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते’, असा टोला नाव न घेता नारायण राणेंनी अनिल परबांना लगावला आहे.

शिवसेना विरूद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे. त्यातच दोघेही एकमेकांवरील टीकेची एकही संधी सोडताना पाहायला मिळत नाही. नारायण राणे यांनी काल थेट पत्रकार परिषदेमधून अनिल परबांचं नाव न घेता घणाघाती हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर ‘तो शिवसेनेचा कलेक्टर आहे, सगळ्यांचे पैसे गोळा करतो’, असं म्हणत राणेंनी प्रहार केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या या हल्ल्याला शिवसेनेकडून किंवा अनिल परबांकडून काय प्रत्युत्तर मिळणार?,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता परबांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाढतच जाणार की, कमी होणार?, हा प्रश्नही विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More