बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच राणे विरूद्ध ठाकरे हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही आणि त्यात भर म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या प्रहार या दैनिकामधून थेट मुख्यमंत्र्यावर प्रहार केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, आजच्या प्रहार या दैनिकात ‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’, या शिर्षकाखाली नारायण राणे यांनी अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आहे. ‘मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व ना धर्म!’, असं म्हणत मुख्यमंत्रिपद हे सत्तेच्या लालसेपोटी मिळवलेलं असल्याचा घणाघाती हल्ला त्यांनी केला आहे.

घाबरट आणि पुळचट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही, असा टोलाही राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. आजच्या नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची आणि टीकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद कसं मिळालं?, त्या रात्री नेमकं काय घडलं?, ते देखील त्यांनी सांगितलं आहे.

सत्तेसाठी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे हे 1925 साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत, असा हल्ला  करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचाही चांगलाच खरपूस समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? नारायण राणेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खासदार रक्षा खडसेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुर्वीच मोठा धक्का

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 2 रुपये अधिक खर्चुन मिळेल 365GB डेटा, फ्री काॅलिंग अन्…

पेट्रोल-डिझेलची दरवाढ काही थांबता थांबेना, सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलं

इम्रान खानवर स्वत:च्याच देशात चोरी करण्याची आली वेळ?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More